काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशात रात्रीच्या वेळी ड्यूटीवर असताना झोपलेल्या वॉचमॅनचं हत्याकांड सुरू आहे. गेल्या काही दिवसात 6 वॉचमनची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. पोलिसांनी अखेर आरोपीला अटक केली आहे. अटक केल्यानंतर जेव्हा आरोपीने हत्याकांडाचं कारण सांगितलं तर अनेकांना धक्काच बसला.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात राहणाऱ्या एका व्यक्तीला भोपाळमधून अटक करण्यात आली आहे. हा आरोपी बाहेर झोपलेल्या वॉचमॅनची हत्या करीत होता. आतापर्यंत त्याने 4 वॉचमॅनचं डोकं फोडून त्यांची हत्या केली होती. आरोपीचं नाव शिव प्रसाद अशून तो सागर जिल्ह्यातील एका गावातील रहिवाशी आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी शिव प्रसाद फेमस होण्यासाठी हत्या करीत होता. आरोपी चित्रपट KGF ने प्रेरित होता. भविष्यात पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या करण्याचाही त्याचा प्लान होता. सीरियल किलरचा संबंध पुण्यातील हत्यांशी संबंधित असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. पोलीस आरोपीची चौकशी करीत आहे. तो अस्खलित इंग्रजी बोलतो. आरोपी झोपलेल्या वॉचमॅनवर निशाणा साधत होता. आरोपी मनोरूग्ण असल्याचंही सांगितलं जात आहे. सीसीटीव्ही आणि मोबाइल लोकेशनच्या आधारावर त्याची ओळख पटवण्यात आली आहे. काल रात्री ही एका वॉचमॅनची हत्या करण्यात आली होती. त्याचा लाइव्ह सीसीटीव्ही समोर आला आहे. या सीसीटीव्हीमध्ये आरोपी वॉचमॅनची हत्या करताना दिसत आहे. सीरिजय किलरने सागरमध्ये 4, भोपाळमध्ये 1, पुण्यात एका वॉचमॅनची हत्या केली आहे.
