दारूच्या नशेत पत्नीचा गळा आवळून केला खून

फुले शाहू आंबेडकर
0
नवापूर : देवमोगरा येथे घरगुती वादातून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. टीना अविनाश पाडवी (३३) असे मृत महिलेचे नाव आहे. संशयित आरोपी अविनाश पाडवी (४०, रा. देवमोगरा ता. नवापूर ) यास विसरवाडी  पोलिसांनी अटक केली आहे 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी सायंकाळी संशयित  अविनाश पाडवी याने दारूच्या नशेत पत्नीसोबत घरगुती भांडणावरून गळा आवळून तिच्या पाठिवर, चेहऱ्यावर, दोन्ही पायांवर मारहाण करून जिवे ठार केले. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन पाटील, उपनिरीक्षक भूषण बैसाणे, सहाय्यक उपनिरीक्षक नरेंद्र वळवी आदींनी घटनास्थळी धाव घेतली 
पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात आणला. वैद्यकीय अधिकारींनी फॉरेन्सिक वैद्यकीय तपासणी तसेच विच्छेदनासाठी शासकीय जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे पाठविला. घटनेप्रकरणी गुलाबसिंग वसावा यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीत अविनाश जेना पाडवी यास ताब्यात घेतले. उपनिरीक्षक भूषण बैसाणे तपास करीत आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default