कुपवाड येथील राहणारे प्रणव पाटील या तरुणाचे त्याच्या घरापासून अज्ञात सहा जणांनी गाडीतून फिल्मी स्टाईलने गुरुवारी अपहरण केल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात प्रणव पाटील यांची पत्नी वैष्णवी यांनी अपहरणाची तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.
पाेलीसांनी अवघ्या 24 तासांत या अपहरणाचा छडा लावला. पाेलीसांनी प्रणव पाटील यांची सुटका केली. या प्रकरणात पाेलीसांनी सहा जणांना अटक केली आहे. याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.
पाेलीसांनी दिलेल्या माहितीनूसार राजू काळे (वय 23) , सागर कोळेकर (वय 33), किरण लोखंडे (वय 23 ), सोन्या उर्फ बापू येडगे (वय 27) , संदेश घागरे (वय 19) आणि कल्पेश हजारे (वय 21 अशी अटक केलेल्यांचे नावे आहेत. सागर कोळेकर यांनी आपल्या साथीदारांच्या मदतीने पाटील यांचं अपहरण केल्याचे कबुली दिली आहे.
दुप्पट अमिष आणि अधिक परताव्याच्या आमिषाने सागर कोळेकर याने गावातल्या काही लोकांकडून सुमारे एक कोटी रुपये शेअर मार्केटमध्ये प्रणव पाटील यांच्याकडे गुंतवले होते. मात्र कोणत्याही प्रकारचा परतावा व पैसे प्रणव पाटील हा परत करत नव्हता.
