रेशन धान्याचा काळाबाजार; २५ टन तांदूळ जप्‍त

फुले शाहू आंबेडकर
0
धुळे : अवैध व्यवसायांविरोधात पोलिस दल अॅक्शन मोडमध्ये आले आहे. दररोज धडक कारवाई  पोलीस प्रशासनातर्फे केली जात असून आज देखील  रेशनचा तांदूळ काळ्याबाजारात जात असताना पकडला आहे. तांदळाचा ट्रक पोलिसांनी जप्‍त केला आहे 
चाळीसगाव  रोड पोलिस ठाण्याचे एपीआय संदीप पाटील यांच्यासह पथकाने चाळीसगांव रोडवरील जयशंकर कॉलनीतून तांदळाचा ट्रक पकडला आहे. हा तांदुळ रेशनचा असल्याचा संशय  असल्याने ट्रकसह सुमारे 25 टन तांदळासह एकूण 20 ते 25 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत पुरवठा विभागाला कळविण्यात आले असून त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती चाळीसगाव रोड पोलिसांतर्फे देण्यात आली आहे.

गेल्‍या आठवड्यातही तीन ट्रक जप्‍त

रेशन तस्करांवर विरोधात सलग कारवाई सुरू असून गेल्या आठवड्यात देखील रेशनच्या तांदळाचे तीन ट्रक पकडण्यात आले होते. दरम्यान सलग कारवाईमुळे रेशन धांन्याचा काळाबाजार करणाऱ्यांचे ढाबे चांगलेच दणाणले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default