मिळालेल्या माहितीनुसार, धुळ्यात पोलीस निरीक्षकाने प्रशिक्षण केंद्रातील शासकीय निवासात आत्महत्या केली आहे. प्रवीण कदम असे आत्महत्या केलेल्या पोलीस निरीक्षकांचे नाव आहे. प्रवीण कदम यांनी आत्महत्या केल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस निरीक्षक प्रवीण कदम हे गेल्या तीन वर्षांपासून धुळे येथे नियुक्त होते. या घटनेने धुळ्यातील पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पोलीस निरीक्षक कदम यांच्या आतमहत्येने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करीत आहे.
बायकोच्या जाचाला कंटाळला पती; उचललं टोकाचं पाऊल
पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यात पतीच्या कुटुंबीयांनी सून आणि तिच्या नातेवाईकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. पुण्यातील खडकी भागात ही घटना घडली. समीर नाईक असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पत्नी आणि तिचे कुटुंबीय समीर यांना सतत त्रास देत होते. गेल्या ४ वर्षांपासून हा त्रास सुरू असल्याचे समीर यांचे वडील निवृत्ती नाईक यांनी सांगितले. तसेच त्यांनी सूनेसह तिच्या नातेवाईकांवर समीर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे.
