नात्‍याला काळीमा; चुलत आजोबाकडून गतीमंद मुलीवर बलात्कार

फुले शाहू आंबेडकर
0
नांदेड : घरात कुणी नसल्याचा फायदा घेत गतीमंद नातीवर चुलत आजोबाने बलात्कार केल्याची खळबळजनक घटना नांदेडमध्ये घडली. नात्याला काळीमा फासणाऱ्या घटना नांदेड जिल्‍ह्यात सोमवारी घडली.
पिडीत मुलीचे वडील लहान मुलीला सोबत घेऊन बाहेर गेले होते. यादरम्‍यान पिडीत 22 वर्षीय गतीमंद असलेली नात घरात एकटीच असल्याचा डाव साधत शेजारी राहणाऱ्या 55 वर्षीय चुलत आजोबा मारोती याने  बलात्कार केला

मारहाण करुन केले पोलिसांच्या स्वाधिन

घटनेची कुणकुण लागताच नातेवाईकांनी मारोती याला बेदम मारहाण करुन  पोलिसांच्या स्वाधिन केले. या प्रकरणी मारोती याच्‍या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default