भुसावळ येथे तीनशे रूपयांची लाच 'मनिषा'ला घेवून गेली गजाआड

फुले शाहू आंबेडकर
0
इंडेक्स टू अर्थात सातबाराच्या उतार्‍यावर खरेदीदाराचे नाव नोंद करण्यासाठी खडका महिला तलाठी मनिषा निलेश गायकवाड यांनी अवघ्या तीनशे रूपयांच्या लाचेची  मागणी केल्याने या संदर्भात लाचलुचपत विभागाने त्यांना ताब्यात घेतल्याची घटना खडका ता.भुसावळ येथे घडल्याने महसुल विभागात खळबळ उडाली आहे.

अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार यांनी सजा खडका हद्दीमध्ये प्लॉट खरेदी केलेला आहे त्यामुळे तक्रारदार हे सदर प्लॉटचे इंडेक्स-2 व खरेदीखत घेऊन 7/12 उतार्‍यावर नाव लावणेसाठीच्या तलाठी, सजा खडका व साकरी कार्यालयात अर्ज केला असता वरील तालाठी यांनी तक्रारदार यांचेकडे त्यांचे नाव लावण्याच्या मोबदल्यात यांचेकडे पंचासमक्ष 300 रुपये लाचेची मागणी केले.

ही लाच रक्कम पंचासमक्ष स्वतःस्विकारतांना त्यांना तलाठी कार्यालय खडका येथे रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांच्यावर भुसावळ तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई शशिकांत पाटील पोलिस उप अधीक्षक सहसापळा अधिकारी व पथकात संजोग बच्छाव, एन.एन.जाधव, शैला धनगर, ईश्वर धनगर, राकेश दुसाने यांचा समावेश होता. तर याकामी सुरेश पाटील, सुनिल पाटील, रविंद्र घुगे, जनार्धन चौधरी, किशोर महाजन, सुनिल वानखेडे, बाळू मराठे, सचिन चाटे, प्रणेश ठाकुर, अमोल सुर्यवंशी यांचे सहकार्य मिळाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default