याबाबत समता नगरात राहणार्या पीडित 34 वर्षीय महिलेने शहर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मजुरी काम करणारा राकेश मोहनलाल अग्रवाल (वय 35 रा. चक्करबर्डी रोड, भाईजी नगर, धुळे) हा दि. 4 जानेवारी रोजी रात्री 12 वाजेच्या सुमारास महिलेच्या घरी जावून तिला शिवीगाळ व दमदाटी केली.
जीवे मारण्याची धमकी देेत तिला स्वयंपाक खोलीत नेले. तेथे जबरीने तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी राकेश अग्रवाल याच्याविरोधात भादंवि कलम 376 (1), 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून आज दुपारी न्यायालयात हजर केले असता तीन दिवस पोलिस कोठडी देण्यात आली. पुढील तपास पीएसआय डी.डी.धनवटे हे करीत आहेत.
