पालिका प्रशासनातर्फे दुकानातून लाखोंचा प्लास्टिक जप्त

फुले शाहू आंबेडकर
0
धुळे : धुळे महापालिकेच्‍या पथकाने शहरातील प्‍लास्‍टीक दुकानावर छापा टाकत आज कारवाई केली. या कारवाईत लाखो रूपयांचे प्‍लास्‍टीक जप्‍तची कारवाई प्रशासनाने केली आहे. 
धुळे महापालिकेच्या पथकाने स्वच्छ सर्वेक्षण, माझी वसुंधरा अभियानातंर्गत  धुळे शहरातील ऊसगल्लीतील दक्षिणमुखी मारोती मंदिराजवळील श्री हरि कृष्णा प्लॉस्टिकच्या दुकानावर छापा टाकत कारवाई केली. दुकानातून तब्बल २ टन प्लॉस्टिक जप्त करण्यात आले आहे. त्याची किंमत दीड ते दोन लाख रूपये आकारण्यात आली आहे.

दुकान मालकाला दंड

दुकान मालक गिरीष वासवाणी यांच्याकडून दंडही वसूल करण्यात येणार आहे. तसेच दंड न भरल्यास थेट पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल; अशी माहिती यावेळी पथकाच्या प्रमुखांतर्फे देण्यात आली आहे. यापुढेही ही कारवाई अशीच सुरू राहणार असल्याचे देखील पालिका प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default