शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने सर्वच्या सर्व 18 जागांवर दणदणीत विजय

फुले शाहू आंबेडकर
0
शिरपूर : माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने सर्वच्या सर्व 18 जागांवर दणदणीत विजय संपादन केला.

आमदार अमरिशभाई पटेल यांच्या गेल्या 35 वर्षांच्या राजकीय नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यापासून ते आजपर्यंत भाई हे स्वतः नेतेमंडळी यांच्याबरोबर कामानिमित्त मुंबई येथे होते. ते स्वतः या निवडणुकीत शिरपूरमध्ये नसताना देखील त्यांच्या विकासकामांवर विश्वास ठेवून शिरपूर तालुक्यातील जनतेने भाईंच्या नेतृत्वाखालील पॅनल ला एकतर्फी विजय मिळवून दिला, भरघोस मतांनी बाजार समितीच्या सर्व उमेदवारांना विजयी केले.

तालुक्याचे आमदार काशिराम पावरा, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली सदर निवडणूक लढविण्यात आली.

सर्व विजयी उमेदवारांनी एकच जल्लोष करत जनक विला निवासस्थान आमदार कार्यालयात विजय व आनंदोत्सव साजरा केला. यावेळी आमदार काशिराम पावरा, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, शिरपूर एज्युकेशन सोसायटी उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, सर्व पदाधिकारी, शहर व तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

सेवा सहकारी संस्था मतदार संघ - सर्वसाधारण मतदार संघ :

गुजर बाळासाहेब शिवाजी 203 (अर्थे खु., शिटी), गुजराथी किरण बद्रीनाथ 672 (अर्थे बु., कपबशी), जमादार शांतीलाल इंद्रसिंग 657 (आढे, कपबशी), पाटील अरविंददास आनंदा 662 (तरडी, कपबशी), पाटील कांतीलाल दगा 624 (जापोरा, कपबशी), पाटील चंदू धोंडू 653 (अजंदे बु., कपबशी), पाटील मनोहर रमेश 210 (ग्रामपंचायत पाटील वाडा, बोराडी, शिटी), पाटील मिलींद लोटन 241 (शिंगावे, शिटी), पाटील मोहन साहेबराव 260 (वनावल, शिटी), पाटील शरद मंगा 213 (वाडी, शिटी), पाटील शिवाजी धनगर 601 (जवखेडा, कपबशी), पाटील संतोष देवराम 224 (तरडी, शिटी), महाजन विठोबा सिताराम 559 (सावळदे, कपबशी), राजूपत गोपालसिंग रणजितसिंग 265 (अजंदे बु., शिटी).

सेवा सहकारी मतदार संघ - महिला राखीव मतदार संघ :

पाटील मेघा राजेंद्र 689 (खामखेडा प्र.था., कपबशी), मराठे मनीषा राजकपूर 691 (उंटावद, कपबशी), महाजन उज्वला रमेश 256 (बाभुळदे, शिटी), राजपूत संगिताबाई वासुदेव 260 (होळनांथे, शिटी).

सेवा सहकारी संस्था मतदार संघ - इतर मागासवर्ग मतदार संघ :

पाटील प्रसाद मोहन 762 (पाटील वाडा खालचेगाव शिरपूर, कपबशी), भदाणे मनोहर शिवदास 233 (करवंद, शिटी).



पावरा कृष्णा गेंदराम 730 (आंबे, कपबशी), पावरा मोहन सोन्या 257 (हेंद्रयापाडा, शिटी).

ग्रामपंचायत मतदार संघ - सर्वसाधारण मतदार संघ :

परदेशी हिरालाल पुनमचंद 246 (हिसाळे, शिटी), पाटील लक्ष्मीकांत बापुराव 793 (दहिवद, कपबशी), राऊळ आनंदसिंग दर्यावसिंग 719 (करवंद, कपबशी).

ग्रामपंचायत मतदार संघ – अनुसूचित जाती / जमाती मतदार संघ :

पावरा जगन सुपा 769 (उमर्दा, कपबशी), पावरा विलास कैलास 261 (जामन्यापाडा, शिटी).

ग्रामपंचायत मतदार संघ – आर्थिक दुर्बल घटक मतदार संघ :

बोरसे मिलींद दौलतराव 777 (हिंगोणी, कपबशी), राजपूत हेमराज प्रकाश 256 (वासर्डी, शिटी).

व्यापारी व अडते मतदार संघ :

अग्रवाल अर्पित घनशाम 76 (अरविंद मेडिकल शिरपूर, पंखा), चौधरी संतोष धोंडू 55 (मयूर कॉलनी शिरपूर, टेलिफोन), जैन सतिष दगडूलाल 72 (के.जी.नगर शिरपूर, टोपी), पाटील मोहन पंडित 49 (ब्रह्मटेक शिरपूर, छत्री), मोरे सतिष मनोहर 10 (चौधरी गल्ली शिरपूर, शिटी).

हमाल व तोलारी मतदार संघ :

कढरे किरण जतन 162 (बुद्धवाडा शिरपूर, ऑटो रिक्शा), चांदे डॅनी विश्राम 110 (बौद्धवाडा शिरपूर, विमान), रुखमे प्रकाश झुंबर 23 (खालचे गाव मार्केट रोड शिरपूर, पणती).

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default