वाघाची कातडी व नखांची तस्‍करी; शहाद्यात टोळी गजाआड

फुले शाहू आंबेडकर
0
नंदुरबार जिल्ह्यातील शहाद्यात वनविभागाने मोठी कारवाई केली आहे. यात वाघाची कातडी आणि नखांची अवैध तस्करी करत असलेल्‍याच्‍या आरोपावरून चार जणांना अटक केली आहे.
अटक केलेल्या आरोपींच्या दाव्यानुसार गुजरात राज्यातून वाघाची कातडी आणि नखांची तस्करी केली गेली होती. यानंतर शहाद्यात एका ग्राहकाला याची विक्री केली जाणार होती. वन विभागाला तीन जण शहाद्यात वाघाची कातडीसह नखे अवैधरित्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती होती. त्‍यानुसार वन विभागाने पोलिसांच्‍या मदतीने सापळा रचला होता.
कातडी व २० नखे जप्‍त

वन विभागाने सापळा रचून या तीन जणांना अटक केली. त्याचबरोबर ग्राहकाला देखील ताब्यात घेतल्यावर त्यांच्याजवळ असलेल्या वाघाची कातडी, २० नग नखे मिळून आली. आरोपींना न्यायालयाने ५ दिवसांची वन कोठडी सुनावण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default