पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतक पत्नीचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवले आहेत. तर आरोपी पतीला पोलिसांनी अटक करीत त्याच्यावर खुनाचा गुन्हा नोंदविला आहे. या संदर्भात अधिक तपास अचलपूर पोलीस करीत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
पतीला जेवणाचा डबा नेऊन द्यायला गेलेल्या पत्नीच्या चारीत्रयावर संशय घेत पतीने दगडाने ठेचून पत्नीची हत्या केली. स्थानिक विलायतपुरा भागात शुक्रवारी सकाळी आठच्या दरम्यान ही घटना घडली
शेजारील लोकांना घरातून किंचाळण्याचा आवाज येत असल्याने त्यांनी घरात जाऊन बघितले असता पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. स्थानिक लोकांनी तात्काळ अचलपूर पोलीस स्टेशनला या घटनेची माहिती दिली असता पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठत आरोपीला अटक केली.
हत्या करणारा आरोपी हा बीड जिल्ह्याचा रहिवासी आहे. तर पत्नी ही मूळची अचलपूरची असल्यामुळे तो अचलपूरला राहायला आला होता. त्याला दारू आणि गांजाची वाईट सवय लागली होती. स्थानिक विलायपुरा भागात तो भाड्याच्या घरात राहत होता. पत्नी परतवाडा येथील कपड्याच्या शोरूम मध्ये काम करीत होती. मृत महिलेस एक 16 वर्षाचा व 14 वर्षाचा असे दोन मुले आहेत.
