अश्लील व्हिडिओ काढून ते प्रसारित करण्याची धमकी देत अल्पवयीन तरुणीचा विनयभंग

फुले शाहू आंबेडकर
0
अश्लील व्हिडिओ काढून ते प्रसारित करण्याची धमकी देत अल्पवयीन तरुणीचा वेळोवेळी विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भद्रकाली पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. धीरज राजेश जेवरानी, असे संशयिताचे नाव आहे
संशयित धीरज जेवरानी यांचा चिक्की तयार करण्याचा व्यवसाय आहे. तरुणीची आणि संशयिताची ओळख सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली. त्यानंतर कॉलेज रोड, तपोवन अशा विविध ठिकाणी भेटू लागले. यादरम्यान संशयिताने लज्जा उत्पन्न होईल असे अश्लील कृत्य केले. तिचे अश्लील व्हिडिओ काढले. ते व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देत गेली दोन वर्ष वारंवार तिच्याशी संशयित अश्लील कृत्य करत राहिला. संशयितास मंगळवारी (ता.२) न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default