माझी बहीण माझ्या पतीसोबत तर आई सासऱ्यासोबत फरार झाली, आता..'; रडत रडत पोलिसांकडे पोहोचली महिला

फुले शाहू आंबेडकर
0
ती पोलिसांना म्हणाली, की साहेब माझी मदत करा. माझ्या लहान बहिणीला माझा पती आणि माझ्या आईला माझ्या सासऱ्याने पळवून नेलं आहे.
प्रेमाचं एक अतिशय अजब प्रकरण समोर आलं आहे. इथे एक महिला पोलीस ठाण्यात पोहोचली. ती पोलिसांना म्हणाली, की साहेब माझी मदत करा. माझ्या लहान बहिणीला माझा पती आणि माझ्या आईला माझ्या सासऱ्याने पळवून नेलं आहे. आता तुम्हीच सांगा मी कुठे जाऊ. महिलेची तक्रार ऐकून पोलीसही हैराण झाले. पीडितेच्या तक्रारीवरून त्यांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. मात्र, महिलेच्या पतीशी बोलणं झालं तेव्हा धक्कादायक खुलासा समोर आला. हे प्रकरण बिहारच्या मुजफ्फरपुरमधील आहे.
हे प्रकरण सकरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. येथे राहणाऱ्या सुधा कुमारी नावाच्या महिलेनं ९ जून रोजी पोलिसांना सांगितलं की, ‘मी फरीदपूर गावची रहिवासी आहे. 27 जून 2021 रोजी माझं लग्न छोटू नावाच्या तरुणाशी झालं होतं. तो भगवानपूरचा रहिवासी आहे. लग्नानंतर मी आणि छोटू सुखात राहत होतो. आम्हाला एक मुलगीही होती. जिचं आम्ही मिष्टी असं नाव ठेवलं. ती फक्त एक वर्षाची आहे. दरम्यान, माझ्या अल्पवयीन बहिणीशी छोटूचं फोनवर बोलणं सुरू झालं. या संवादाचं प्रेमात कधी रुपांतर झालं ते कळलंच नाही. गेल्या काही दिवसांपासून माझ्या पतीचं माझ्याशी असलेलं वागणंही बदललं आहे. तो माझ्यावर सर्व प्रकारचे आरोप करू लागला आणि माझ्यापासून दूर राहण्याची कारणं शोधू लागला.’.
सुधाने सांगितलं की, 3 जून रोजी छोटू आणि माझी लहान बहीण घरातून पळून गेले. दोघेही मुझफ्फरपूर स्टेशनवर लग्न करून दिल्लीला गेले. सुधाच्या म्हणण्यानुसार, यानंतर ती तिच्या माहेरी आली आणि तिने संपूर्ण घटना तिची आई फूल कुमारी (45) यांना सांगितली. ५ जून रोजी मी तुझ्या सासरच्या घरी जाऊन याबाबत बोलते, असं फूलकुमारीने तिला सांगितलं. सुधा म्हणाली की आईने तिच्या सासरी जाताना तिला सोबत घेतलं नाही. नंतर ती आईची वाट पाहत राहिली. पण आईही घरी परत आली नाही.
पीडितेने सांगितलं की, ‘काही दिवसांनी मला समजलं की, माझी आई माझा सासरा बिराजी भगतसह फरार झाली आहे. दोघेही दिल्लीत राहतात. आता ना आई माझा फोन उचलते, ना कोणी माझ्याशी बोलतं. सर कृपया मला मदत करा,’ असं ती म्हणाली. सुधाने पोलिसांत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तपास सुरू केला असता त्यांनी छोटूशी संपर्क साधलं. यानंतर छोटूने पोलिसांना जे काही सांगितलं, त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. छोटू म्हणाला, ‘माझ्या सासूने माझं लग्न माझ्या मेहुणीसोबत करून दिलं आहे. त्या बदल्यात ती मला कार आणि पैसे देईल, असं तिने सांगितलं होतं. मला दोन्ही पत्नींसोबत राहायचं आहे.’ याप्रकरणी पोलीस आता कारवाई करत आहेत 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default