2 तरुणांच्या प्रेमात पडली विवाहित महिला; प्रियकरांच्या मदतीने पतीसोबतच केलं कांड

फुले शाहू आंबेडकर
0
इंद्रपालची पत्नी शशी हिचे त्याच सोसायटीत राहणारे कुलदीप आणि बलकांत यांच्याशी प्रेमसंबंध होते. मात्र या प्रेमप्रकरणात पती अडथळा ठरला.
नवरा बायकोचं नातं हे प्रेम आणि विश्वासावर टिकून असतं. त्यामुळे दोघांनीही एकमेकांसोबत प्रामाणिक राहाणं अतिशय गरजेचं असतं. मात्र, काही लोक याचा जराही विचार न करता आपल्या जोडीदाराची फसवणूक करतात आणि अनेकदा याचे परिणाम अतिशय भयानक होतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. राजस्थानच्या तिजारा येथील शेखपूर पोलीस ठाण्यांतर्गत ही हत्या घडली आहे. यानंतर 24 तासांत पोलिसांनी याचा खुलासा करून आरोपीला अटक केली. या हत्येची सूत्रधार दुसरी कोणी नसून तरुणाची पत्नी असल्याचं समोर आलं आहे.
अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीची पत्नीने हत्या केली. हरियाणातील सिरसा जिल्ह्यातील रहिवासी असलेला इंदरपाल खुशखेडा येथील बनवीरपूर येथील आनंदा ग्रीन सोसायटीमध्ये पत्नी शशीसोबत राहत होता. इंद्रपालची पत्नी शशी हिचे त्याच सोसायटीत राहणारे कुलदीप आणि बलकांत यांच्याशी प्रेमसंबंध होते. मात्र या प्रेमप्रकरणात पती अडथळा ठरला
अखेर पत्नीने आपल्या दोन प्रियकरांसोबत हत्येचा कट रचला. कटाचा एक भाग म्हणून 15 दिवसांपूर्वी पत्नी शशी न सांगता घरातून गायब झाली. ठरल्याप्रमाणे आरोपी कुलदीप आणि बलकांत यांनी तिच्या पतीला तिजारा येथे एका बाबाकडे घेऊन जात असल्याचं सांगत घरातून नेलं. यानंतर रस्त्यातच त्याचा गळा चिरून खून केला.
शेखपूर पोलीस स्टेशनचे एसएचओ कमलेश कुमार यांनी सांगितलं की, या हत्येमध्ये पोलिसांनी मृताच्या पत्नीच्या नावे असलेली स्कूटर जप्त केली आहे. या घटनेनंतर मृताची पत्नी बेपत्ता झाल्याने संशय बळावला होता. अखेर या हत्या प्रकरणाचा खुलासा झाला. या खुलाशानंतर ही घटना संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default