या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) विधानसभा क्षेत्र तालुका अध्यक्ष दिलीप भाईदास पाटील प्रमुख उपस्थित होते. यावेळी त्यांनी राजमाता जिजाऊंनी दिलेले संस्कार, शौर्य, स्वराज्यनिष्ठा आणि सामाजिक न्यायाचे विचार आजच्या पिढीने आत्मसात करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास जयाबाई दिलीप पाटील, मिनाताई पवार, विद्यार्थीनी, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. याशिवाय संतोष ठणगर, पोलीस पाटील बाळा भदाणे, नरेंद्र पाटील, संजय पाटील, मनोहर भदाणे, अशोक पाटील, दिनेश पाटील, दशरथ पाटील, गंगाधर पाटील, भैय्या मराठे, रमेश मराठे, भुरा भदाणे, ईश्वर पाटील यांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
राजमाता जिजाऊ या केवळ एका राजमाताच नव्हे तर स्वराज्य घडविणाऱ्या प्रेरणास्थान असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. समाजातील अन्याय, अत्याचार व विस्कळीत होत चाललेल्या सामाजिक मूल्यांच्या पार्श्वभूमीवर जिजाऊंचे विचार आज अधिकच महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात आले.
कार्यक्रम शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. शेवटी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

