ज्येष्ठ नागरिक संघ, शिरपूर यांची मासिक सभा रविवार दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी अत्यंत उत्साही आणि सकारात्मक वातावरणात पार पडली. संघाचे अध्यक्ष श्री. अनिल उत्तमराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा संपन्न झाली.
सभेच्या प्रारंभी अध्यक्षांनी मागील बैठकीच्या प्रोसिडिंगचे वाचन करून मागील वर्षातील जमा–खर्च अहवालास सर्वानुमते मंजुरी देण्यात आल्याची माहिती दिली. आगामी काळात व्याख्यानमाला, सहल, वनभोजन तसेच विविध सामाजिक व आरोग्यविषयक विषयांवर चर्चा आयोजित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.
यावेळी संघाचे सहसचिव श्री. किशोर मन्साराम दलाल व संचालक श्री. प्रकाश गंगाराम पाटील यांचा वाढदिवस शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन साजरा करण्यात आला. अध्यक्ष श्री. अनिल पाटील यांनी दोन्ही मान्यवरांच्या शांत, संयमी स्वभावासह संघासाठी केलेल्या कार्याचे मनापासून कौतुक केले.
यानंतर डॉ. लखीचंद जाधव, श्री. मधुकर पाटील (भाऊसाहेब), हमीद भाई, प्रा. ए. डी. पाटील व श्री. सुभाष पवार यांनीही मनोगत व्यक्त करत त्यांच्या सामाजिक बांधिलकीचा आणि संयमी वृत्तीचा उल्लेख केला.
सभेस संघटक श्री. सुभाष पवार, संचालक श्री. प्रकाश गंगाराम पाटील, श्री. सोमा भामरे, श्री. कृष्णसिंग राजपूत, श्री. मधुकर आत्माराम पाटील, श्री. हमीद पठाण, श्री. किशोर दलाल, श्री. शशिकांत धाकड, श्री. सुधाकर चौधरी, श्री. गोपाळ बारी, श्री. सुरेश गवळे, श्री. यशवंत माळी, डॉ. लखीचंद जाधव, सल्लागार श्री. प्रकाशभाई जैन यांच्यासह अनेक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. अनिल सोनवणे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. ए. डी. पाटील यांनी केले. सत्काराबद्दल आभार मानताना श्री. किशोर दलाल व श्री. प्रकाश पाटील यांनी वाढदिवसानिमित्त प्रत्येकी ₹१००१/- अशी देणगी संघास दिली. संघातर्फे त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.
शेवटी उपस्थित सर्वांना चहा व नाश्ता देऊन सभा आनंददायी वातावरणात संपन्न झाली.
